आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदार्पण:शेतमजुराचा मुलगा मूख्य भूमिकेत झळकणार

केज25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील समाधान श्रीरंग गालफाडे या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेतानाच मराठी चित्रपटसृष्टीत करिअरचा निर्णय घेत पहिले पाऊल टाकले आहे. मुख्य भूमिका असलेल्या ‘आधान’ नावाच्या मराठी चित्रपटातून त्याने पदार्पण केले असून, या चित्रपटाचा प्रीमियर शो कळंब ( जि. उस्मानाबाद ) येथील पृथ्वीराज चित्रमंदिर येथे २३ ऑक्टोबर रोजी पार पडला.

श्रीरंग गालफाडे याचे आई - वडील मोलमजुरी करतात. त्याला मराठी चित्रपटात करिअर करण्याची संधी देवळाली ( ता. कळंब ) येथील संतोष उद्धव एडके निर्मित ‘आधान’ नावाच्या मराठी चित्रपटातून मिळाली आहे. यात समाधानचे मुख्य भूमिका साकारली असून ए. आर. मूव्हीज प्रस्तुत व लता फिल्म प्रॉडक्शन या संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माता डॉ. दत्ता तपसे, डॉ. स्नेहा बनकर, गजानन बोळंगे (रेड्डी)असून दिग्दर्शक, कथा, गीतकार, छायाचित्रण रोशन एडके, विनोद एडक यांनी केले आहे. संगीत व पार्श्वसंगीत मितेश चिंदरकर यांचे, तर व गायिका अपूर्वा नानिवडेकर यांनी चित्रपटाची गीते गायली आहेत. संकलन, डीआयव्ही एफएक्स श्रावण बोराडे यांनी केले असून कार्यकारी निर्माता व नृत्य दिग्दर्शन संदीप शामराव पाटील यांनी केले आहे. लाइन निर्माता नानासाहेब जाधव आहेत. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून राजेश्वरी खोसे पाटील हिने काम केले आहे. सहअभिनेता अविनाश शिंदे तर इतर कलाकार वैष्णवी पटणे, उत्कर्ष आव्हाड, रोशन एडके भीमा जोगदंड, दिलीप ढगे, अलका घुगे, प्रभुदास दुप्ते ( लातूर ), अंजली पवार, आनंद खुणे, पांडुरंग कदम, मुठाळ, उमेश पाटील, श्रीमती जगदाळे, आदेश तांबी, पूजा लवटे, रोशन एडके, अक्षय शिंदे, बापू एडके, विघ्नेश एडके, जयश्री बिलिंगे, सचिन कांबळे, आदींच्या भूमिका आहेत.

पाटील हिने काम केले आहे. सहअभिनेता अविनाश शिंदे तर इतर कलाकार वैष्णवी पटणे, उत्कर्ष आव्हाड, रोशन एडके भीमा जोगदंड, दिलीप ढगे, अलका घुगे, प्रभुदास दुप्ते ( लातूर ), अंजली पवार, आनंद खुणे, पांडुरंग कदम, मुठाळ, उमेश पाटील, श्रीमती जगदाळे, आदेश तांबी, पूजा लवटे, रोशन एडके, अक्षय शिंदे, बापू एडके, विघ्नेश एडके, जयश्री बिलिंगे, सचिन कांबळे, आदींच्या भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...