आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पीएसआय पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत तालुक्यातील दहिवंडीच्या ओम आघाव याने बाजी मारली अाहे. त्याचे यश हे विशेष असून ऊसतोड मजूर आणि हमालीचे काम करणाऱ्याच्या मुलाने पीएसआय पदाला गवसणी घातली.
ओम आघाव हा शहरापासून जवळ असलेल्या दहीहंडी या भागात राहतो. वडील भागवत आघाव हे ऊसतोडीसह हमालीचे काम करत होते. आई गृहिणी असून दोन बहिणी,एक भाऊ, आई असा परिवार. ओमच्या वडिलांचा २०१७ मध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे सर्व कुटुंबाची जबाबदारी भाऊ व ओम वर येऊन पडली. या खडतर परिस्थितीतून ओमने अभ्यास केला आणि यश संपादन केले. परिस्थिती हलाखीची असल्याने इयत्ता नववीतच त्याने दृढनिश्चय केला होता की एमपीएससीची ची परीक्षा उत्तीर्ण व्हायची. ध्येय समोर ठेवूनच अभ्यास व मेहनत घेतल्याचे ओम आघाव याने यावेळी सांगितले.
गावकऱ्यांनी काढली मिरवणूक
ओम आघाव यांनी बिकट परिस्थितीमध्ये थेट एमपीएससीची उत्तीर्ण करत पीएसआय पदावर मजल मारल्याने ग्रामस्थांनी त्याची सवाद्य शिरूर शहरातून दहिवंडी गावात मिरवणूक काढून ओम आघाव याचा गौरव केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.