आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षात‎ सणोत्सव:सणासुदीत ध्वनी मर्यादा शिथील‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या नव्या वर्षात‎ सणोत्सवाच्या नऊ दिवसांसाठी रात्री‎ बारावाजेपर्यंत ध्वनी मर्यादा शिथील‎ करण्यात आली असल्याची माहिती‎ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने‎ देण्यात आली.‎ पर्यावरण विभाग यांच्या शासन‎ निर्णयान्वये उत्सव कालावधीत १५‎ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत‎ वाद्य बीड जिल्ह्यात ध्वनी प्रदुषण‎ कायद्यातील मधिल अटी व शर्तीस‎ अधिन राहून परवानगी दिली गेली‎ आहे.

यामध्ये, शिवजयंती, ईद-ए -‎ मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, गणपती‎ उत्सवात ४ दिवस, गौरी विसर्जन व‎ अनंत चर्तुदशी, नवरात्री उत्सवात २‎ दिवस, दिवाळी लक्ष्मीपुजन, ख्रिसमस‎ व ३१ डिसंबर २०२३ अशा नऊ‎ सणोत्सवांसाठी मर्यादा शिथील केली‎ गेली असून २ दिवस हे राखीव‎ कार्यक्रमांसाठी राखीव ठेवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...