आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थिनींनी घेतली ठाण्यातील कामकाजाची माहिती‎

केज‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केज येथील पोलिस ठाण्यात पोलिस‎ वर्धापन दिन सप्ताहा निमित्त‎ आयोजित करण्यात आलेल्या‎ कार्यक्रमात शहरातील जयभवानी‎ कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी‎ ठाण्यातील कामकाज, शस्त्राविषयी‎ माहिती जाणून घेत पोलिस अधिकाऱ‎ ्यांशी संवाद साधला. वाहतुकीच्या‎ नियमा विषयी मार्गदर्शन करण्यात‎ आले.‎ केज ठाण्याचे प्रमुख सपोनि शंकर‎ वाघमोडे यांनी पोलीस वर्धापन दिन‎ सप्ताहा निमित्त शालेय विद्यार्थ्यांना‎ पोलिस ठाण्याच्या कामकाज ाविषयी‎ माहिती व्हावी म्हणून शहरातील‎ जयभवानी कन्या प्रशालेच्या‎ विद्यार्थिनींना ठाण्याची भेट घडवून‎ आणली.

पोलिसा ंविषयी मनात‎ असलेली भीती दूर व्हावी, त्यांना‎ पोलिसा ंविषयी आपुलकी वाटावी,‎ अडचण च्या काळात पोलिस मदतीला‎ येऊ शकतात हा विश्वास वाटावा‎ यासाठी त्यांनी मुलींशी संवाद साधला.‎ त्यांनी वाहतुकीच्या नियमा विषयी‎ मार्गदर्शन केले. या वेळी सहाय्यक‎ पोलीस निरीक्षक संतोष मिसळे,‎ फौजदार राजेश पाटील, फौजदार‎ वैभव सारंग यांनी शस्त्राविषयी माहिती‎ देत ठाण्यातील विभागाची माहिती‎ दिली. मुलींनी ही संवाद साधून‎ ठाण्यातील कामकाज ाविषयी माहिती‎ जाणून घेतली. पोलिसांशी मनमोकळ‎ ्यापणे संवाद साधून मनातील भीती दूर‎ झाल्याचे सांगत भारावून गेल्या होत्या.‎

बातम्या आणखी आहेत...