आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर्गत तक्रार‎:विद्यार्थिनींची पोलिस दलाच्या‎ भरोसा कक्षाला दिली भेट‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महिला कला‎ महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार‎ निवारण समितीच्या वतीने‎ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी‎ भरोसा कक्ष, पोलीस अधीक्षक‎ कार्यालयासत भेट दिली. यासह‎ कक्षाचे कामकाज कसे चालते‎ याची माहिती जाणून घेतली.‎ विद्यार्थ्यांनींच्या विविध प्रश्नांची‎ याप्रसंगी उत्तरे देण्यात आली.‎ महिला कला महाविद्यालयाच्या‎ प्राचार्य डॉ. सविता शेटे, अंतर्गत‎ तक्रार निवारण समितीच्या डॉ.वर्षा‎ कुलकर्णी, डॉ. संध्या आयस्कर‎ यांच्या पुढाकारातून हा उपक्रम‎ राबवण्यात आला.

भरोसा पक्षाच्या‎ अनिता तांदळे यांनी विद्यार्थिनींना‎ या समितीचा उद्देश कार्यपद्धती‎ याबद्दल सविस्तर माहिती दिली.‎ याप्रसंगी समुपदेशनासाठी‎ उपस्थित विवाहित जोडप्यांची‎ प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद‎ डॉ.सविता शेटे यांनी साधला.‎ यानंतर अवैध मानवी वाहतूक‎ प्रतिबंधक कक्षास भेट देऊन या‎ विभागाची कार्यपद्धती लखपटे‎ यांच्याकडून जाणून घेतली.‎ तस्करीचे प्रकार, महिला व‎ बालकांची तस्करी, याविषयक‎ घडणाऱ्या कायदेशीर घटना, गुन्हे‎ आणि कायदेशीर कार्यवाही‎ याबाबत सविस्तर माहिती दिली.‎ या प्रसंगी विद्यार्थिनींच्या विविध‎ शंकांचे निरसन पोलिस कर्मचारी‎ धस यांनी केले. यावेळी पोलिस‎ दलातील कर्मचारी हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...