आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरचा जाच:गौरी आगमनाच्यादिवशीच विवाहितेची आत्महत्या; केज तालुक्यातील दरडवाडी येथील घटना

केज11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुंड्यातील राहिलेले आठ लाख मिळत नसल्याने पोलिस पतीसह सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून गरोदर विवाहितेने माहेरी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी आवाहनाच्या दिवशी दुपारी दरडवाडी येथे ही घटना घडली. ज्योती गोविंद जाधवर (२६, रा. उकडगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

तालुक्यातील दरडवाडी माहेर असलेल्या ज्योती जाधवरचा विवाह २०१८ मध्ये उकडगाव (ता. बार्शी) येथील गोविंद जाधवर याच्याबरोबर झाला. पती गोविंद जाधवर हा उस्मानाबादच्या पोलिस दलात नोकरीस आहे. लग्नानंतर एक वर्ष सर्व चांगले चालले होते. त्यांना एक मुलगाही झाला. ज्योती ही सात महिन्यांची गरोदर होती.

हुंड्यासाठी पती गोविंद जाधवर, सासरा वचिष्ट उत्तम जाधवर, सासू लताबाई वचिष्ट जाधवर यांनी तगादा लावून तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. शेवटी वैतागून ज्योती यांनी माहेरी आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...