आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरहजर:शिक्षक दुपारीच गायब,‎ शाळेला ठोकले कुलूप‎

शिरूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खाेकरमोहा जिल्हा‎ परिषद शाळेत आलेले शिक्षक‎ दुपारच्या वेळीच गायब होत‎ असल्याने संतप्त ग्रामस्थांनी‎ बुधवारी गावातील जिल्हा परिषद‎ शाळेला कुलूप ठोकले, तर‎ विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षक द्या‎ अशी मागणी करत गावात ठिय्या‎ मांडला. तालुक्यातील खोकरमोहा‎ येथील जिल्हा परिषद शाळेत सतत‎ शिक्षक गैरहजर राहत आहेत.‎ शाळेत आलेले शिक्षक दुपारच्या‎ वेळी गायब होतात. या शाळेत‎ शिक्षक कमी असल्यामुळे एका‎ शिक्षकावर दोन -दोन वर्ग‎ सांभाळण्याची वेळ आली आहे.‎

शिक्षकांनी गैरहजर राहू नये असे‎ ग्रामस्थांनी त्यांना तोंडी सांगितले.‎ त्यांनतर सरपंच व शालेय‎ व्यवस्थापन समितीने शिक्षकांनी‎ वेळेवर शाळेत यावे असे बजावले‎ होते. परंतु शिक्षक सतत गैरहजर‎ राहत असल्याने बुधवार ४ जानेवारी‎ २०२२ संतापलेल्या पालकांनी‎ गावातील जिल्हा परिषद शाळेला‎ कुलूप ठोकले. त्यामुळे विद्यार्थ्यांना‎ गावात येवुन ठिय्या मांडला. जोपर्यंत‎ आम्हाला शिक्षक मिळत नाही‎ आणि दांडी बहाद्दर शिक्षकांवर‎ कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही‎ येथेच बसून राहणार असा आक्रमक‎ पवित्रा घेतला.‎ खाेकरमोहा जिल्हा परिषद शाळेला बुधवारी ग्रामस्थांनी कुलूप ठोकले.‎

बातम्या आणखी आहेत...