आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शिक्षक पतीला दुसऱ्या शिक्षिकेसोबत नको त्या अवस्थेत पकडले

केज9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक पतीस त्याच्या सहकारी शिक्षिकेसोबत नको त्या अवस्थेत मुख्याद्यापिका असलेल्या पत्नीने पकडल्याचा प्रकार युसूफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. शिक्षक पतीसह अन्य पाच जणांनी मुख्याध्यापिकेस काठीने मारहाण केल्याने पाचही जणांवर युसूफवडगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केज तालुक्यातील अंकुश बाबासाहेब करपे हे त्यांच्या वडिलांच्या संस्थेच्या गावातील शाळेवर शिक्षक आहेत. तर त्यांच्या पत्नी या संस्थेच्या दुसऱ्या गावातील शाळेवर मुख्याध्यपिका आहेत. ३० जुलै रोजी दुपारी १२.४५ वाजता शिक्षक पती अंकुश करपे हे त्यांच्या सहकारी शिक्षिकेच्या घरी गेल्याचा संशय मुख्याध्यापक पत्नीला आला.

तेव्हा शिक्षिकेच्या घरी गेल्या. घरासमोरच त्यांना शिक्षक बजरंग जाधव उभे असल्याचे दिसले. त्यांनी मुख्याध्यापिकेला अडवले. परंतु विरोध करत मुख्याध्यापिका त्या शिक्षिकेच्या घरात गेल्या. तेव्हा त्यांना पती व दुसरी शिक्षिका नको त्या अवस्थेत दिसली. शिक्षक बजरंग जाधव याने मुख्याध्यापिकेला बाहेर ढकलले. शिक्षक अंकुश करपे याने चिडून मुख्याध्यापक पत्नीला मारहाण केली. ऋषिकेश सोळंके याने व सुदर्शन पवार व एका महिलेने मारहाण करीत जखमी केले. अशोक करपे, ऋषिकेश सोळंके, सुदर्शन पवार, सदर शिक्षिका व एक महिला अशा पाच जणांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...