आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:तृतीय रत्न नाटक मनोरंजनाचा विषय नव्हे तर क्रांतीचा विषय; अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचे बीडमध्ये प्रतिपादन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महात्मा फुले लिखित व महाज्योती नागपूर आयोजित अनिरुद्ध वनकर दिग्दर्शित ‘तृतीय रत्न’ नाटकाचा प्रयोग ६ जून रोजी झाला.या नाटकाच्या कार्यक्रमासाठी बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. रफिक बागवान, नवनाथ शिराळे, अ‍ॅड. सोपानराव तांगडे, इंजी. प्रशांत गाडे, अ‍ॅड. सुभाष राऊत, मनिषाताई तोकले, प्रा. भगवान माने प्रा. राजेंद्र गाडेकर, सचिन दुधाळ, संतराम सांगोळे, आश्रुबा बर्डे, अरुण पवार, राजू जोगदंड, किशन तांगडे, या वेळी बोलताना अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, ‘तृतीय रत्न’ नाटक हे मनोरंजनाचा विषय नसून क्रांती प्रतिक्रांतीचा विषय आहे.

महात्मा ज्योतिराव फुले हे त्या काळातील पहिले मानवतावादी व्यक्ती होऊन गेले. त्या काळातील अनेक संत विचारवंत हे भूतदयावादी होते, ते प्राण्यात ईश्वर पाहून त्यावर दया प्रेम करत असत, परंतु महात्मा फुले त्यांच्या सारखे भूतदयावादी व्यक्ती नव्हते, महात्मा फुले म्हणतात काळाच्या ओघातील मागे पडलेल्या कुठल्याही समाजाला पुढारलेल्या समाजाने अधिकार देणे ही या समाजाची लायकी असू शकत नाही.

पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा निसर्गत: स्वतंत्र म्हणून जन्माला येतो, म्हणून त्याला त्याच्या मनाप्रमाणे जगण्याचा, शिक्षणाचा, लिहिण्याचा, लिहिलेले प्रकाशित करण्याचा, वाचण्याचा, त्यास वाटेल तो व्यवसाय करण्याचा हे सगळे अधिकार त्याला कुठल्यातरी समाजाने किंवा एखाद्या वर्गाने दिलेले नसतात. तर ते अधिकार त्याला जन्मताच मिळालेले असतात.

अशा प्रकारच्या मानवतावादाची कल्पना मांडून अशा प्रकारे समाजाला कोणी काही देत असेल तर त्याबद्दल खूप काही कौतुक वाटत असेल तर त्यांनी हे नाटक पाहून बोध घ्यावा व जे देणारे कुणी असेल जे जे आपल्या हक्काचे आहे ते निसर्गानेच आपल्याला दिलेले आहे तो त्याचा नैसर्गिक अधिकार सोडून द्यावा. अशा प्रकारचे विचार उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संगीता टिपले यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी इंजि. बी.डी. साळवे, विष्णू कांबळे, सुरेश वाघमारे, राहुल साळवे, अविनाश गडगे, सूर्यकांत जोगदंड, बाबासाहेब जगताप, बी.आर. गायकवाड, यशवंत कदम, बाळू शिंदे, अनिल डोळस, राजेंद्र ससाने यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...