आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:मापात पाप करणाऱ्या कारखानदारांचा काटा काढणार ; शेट्टी

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निर्वाणीचा लढा देण्याचा निर्धार केला आहे. साखर उतारा चोरी, काटामारीच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. येत्या ७ नोव्हेंबरला पुण्यातील साखर संकुलावर राज्यातील २०० साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करा या प्रमुख मागणीसाठी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करीत माजी खा. राजू शेट्टी यांनी येत्या काळात ऊस वजनात काटा मारणाऱ्या राज्यातील २०० साखर कारखानदारांचा काटा काढणार असल्याचा इशाराही दिला.

केज तालुक्यातील युसूफवडगाव येथे सोमवारी आयोजित ऊस, सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषदेत माजी खा. राजू शेट्टी बोलत होते. प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी बब्रुवान कणसे होते. प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. जालंदर पाटील यांनी साखर उतारा व काटामारी, उसातील उपपदार्थापासून मिळणारे फायदे हे अर्थगणित रोखठोक समजावून सांगतले. तर साखर कारखानदारांची चोरी हाणून पाडण्यासाठी, यापुढे मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा दाम मिळून घ्यायचे असतील रस्त्यावर प्रकर्षाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यासोबत राहिले पाहिजे, असे आवाहन यांनी केले. कुलदीप करपे यांनी बीड जिल्ह्यात गेल्यावर्षी अंदाजे ५० लाख टन ऊस विक्रमी गाळप झाला. तर साखर उतारा १३ टक्के असताना येथील साखर कारखानदारांनी संगनमत करून ३ ते अडीच टक्के साखर उतारा कमी दाखवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर दिला, असा आरोप करीत वजनात गाडीला २ ते अडीच टन चोरी केली असल्याचा आरोपही केला. परिषदेला पल्लवी रांजणकर, रवींद्र इंगळे, डॉ. उत्तम खोडसे, गोविंद शिनगारे, शिवदास थळकरी, रमेश पाटील, सतीश शिंदे, राचलिंग पाटील, गुरुप्रसाद थळकरी, ओम खरबड, अण्णा सावंत आदी उपस्थित होते.

परिषदेत सात ठराव मंजूर
परिषदेत उसाला पहिली उचल २९०० रुपये व सरासरी एफआरपी + ३५० रुपये अंतिम दर द्यावा, साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करावेत, सोयाबीनला ८६०० रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, मांजरा धरणातील अतिरिक्त संपादित क्षेत्राचा मावेजा विलंब व्याजासह द्यावा, सन २०२०, २१, २२ चा पीक विमा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसह ७ ठराव शेतकऱ्यांनी हात उंचावून मंजूर केले.

बातम्या आणखी आहेत...