आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्य‎ सुखी समाधानी जगण्याचा मंत्र‎:संतांचे विचार आत्मसात‎ करावेत : डॉ. क्षीरसागर‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मानवाला योग्य दिशा‎ दाखवून भक्ती भावाने परमेश्वराचे‎ नामचिंतन करून आपले आयुष्य‎ सुखी समाधानी जगण्याचा मंत्र‎ संत वचनातून मिळतो. त्यामुळे संत‎ वचन ऐकून यांचे विचार आत्मसात‎ करणे काळाची गरज असल्याचे‎ प्रतिपादन माजी प्राचार्या डॉ.दीपा‎ क्षीरसागर यांनी व्यक्त केले.‎ बीड तालुक्यातील मुळूक येथे‎ अखंड हरिनाम सप्ताहाचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ रविवारी सप्ताहाची सांगता झाली.‎ याप्रसंगी माजी प्राचार्या डॉ.दीपा‎ क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती‎ होती.याप्रसंगी प्राचार्या क्षीरसागर‎ म्हणाल्या, महाराष्ट्र ही संतांची‎ भूमी आहे.

संत नामदेव, संत‎ ज्ञानेश्वर, गाडगे महाराज,‎ तुकडोजी महाराज आदी अनेक‎ संत येथे होऊन गेले. बीड‎ जिल्ह्याची भूमी देखील अनेक‎ संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली‎ आहे. सध्या माणुसकी संपून जात‎ असून अशा परिस्थितीत संताचे‎ विचार वाचा, त्याचे अनुकरण‎ करा, तेच खरा मार्ग दाखवतील.‎ आज संतांचे वचन ऐकून विचार‎ आत्मसात करणं काळाची खरी‎ गरज आहे.

संत ज्ञानेश्वरांनी १६‎ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून भक्तीचा‎ मार्ग सांगितला. संतांचं साहित्य‎ आजच्या काळात देखील समाजात‎ दीपस्तंभासारखे आहे. अंधकारमय‎ जीवनाला प्रकाश देणारं आहे.‎ आमच्या पूर्वजांनी‎ सांगितल्याप्रमाणे जेवढे दानधर्म‎ करता येईल तेवढे करून पुण्याचे‎ कार्य करावे त्याप्रमाणे आजही‎ क्षीरसागर कुटुंब दानधर्म करून‎ पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी‎ कार्य करत आले आहे. याप्रसंगी‎ महादेव महाराज, भाजपचे‎ जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,‎ शिवसंग्रामचे रामहरी मेटे,‎ गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी‎ आणि भाविक भक्तांची, महिलांची‎ मोठ्या संख्येने उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...