आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा कायम:परिक्षेतील निकालाची परंपरा कायम; अंथवरण पिंप्री तांडा विद्यालयाचे सुयश

बीड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडपासून जवळच असलेल्या अंथवरण पिंपरी तांडा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेने बारावीच्या परिक्षेतील निकालाची परंपरा कायम राखली. बारावी विज्ञान शाखेतून एकूण ८० विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्या पैकी ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल ९७.५३ टक्के इतका लागला. विशेष प्राविण्यासह ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर, ३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

कला शाखेचा निकाल ९५ टक्के लागला. विज्ञान शाखेतून आदित्य पवार, वैष्णवी राम, उत्कर्षा शिंदे,तर कला शाखेतून आरती आमटे, भाऊसाहेब पवार आणि स्नेहल चव्हाण यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृत्तीय क्रमांक मिळवला. संस्थेचे अध्यक्ष दिनेश पवार, सचिव सुशील पवार यांच्यासह इतरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...