आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:बिहारच्या पाटणात झाले होते सराव शिबिर; राष्ट्रीय रग्बी स्पर्धेसाठी कनोजिया यांची निवड

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटना ,बिहार येथे राष्ट्रीय रग्बी फुटबॉल स्पर्धा ९ ते १३ जून दरम्यान होत आहे. नुकत्याच नंदुरबार येथे झालेल्या वरिष्ठ गटातील राज्यस्तरीय खुल्या रग्बी फुटबॉल स्पर्धेत बीडच्या संघाने चमकदार कामगिरी केली. या कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी बीडचा खेळाडू योगेश कनोजिया याची निवड झाली होती. राज्यातील ३० खेळाडूंपैकी योगेश याची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा संघाचे प्रशिक्षक नितीन येळवे, शोएब खाटीक आणि अशोक चौरे यांनी यासाठी त्याला मार्गदर्शन केले.

योगेश कनोजिया हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८,गोरेगाव (पुर्व),मुंबई येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत.स्पर्धेत विजय संपादन करण्यासाठी राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलिस महासंचालक,राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८,मुंबईचे समादेशक शशी कुमार मीना, सहायक समादेशक बी.सी.सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच बीड जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष इसाक शेख, सचिव महेश घुले, उपाध्यक्ष रमेश सानप, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, कार्याध्यक्ष नितीन लिवे, प्रशिक्षक शोएब खाटीक , प्रशिक्षक अशोक चौरे, मार्गदर्शन भगवानराव बागलाने, सतीश उबाळे, शिवराज देवगुडे, प्रशांत मुळे, अदनान शेख इतर सर्व पदाधिकारी आणि समस्त मोरया क्रीडा मंडळ परिवार बीड आदींनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.

बातम्या आणखी आहेत...