आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याचे दागिने हातोहात लंपास:प्रवासी महिलेला गुंगी आणत दीड लाखाचे दागिने लांबवले

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यातील शहागड ते गेवराईदरम्यान बस प्रवास करत असताना एका प्रवासी महिलेच्या शेजारी बसलेल्या अनोळखी महिलेने तिच्या शरीराला स्पर्श करत गुंगी आणत नंतर महिलेच्या पर्समधील तब्बल १ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले.

यशोदा वाल्मीक वाघमोडे (रा.अंकुशनगर, ता. अंबड, ह. मु. बोरगाव जि. लातूर) असे दागिने चोरीला गेलेल्या महिलेचे नाव आहे. ६ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास यशोदा वाघमोडे या शहागड ते गेवराईदरम्यान बस प्रवास करत असताना त्यांच्या शेजारी बसलेल्या एका अनोळखी महिलेने त्यांना गुंगी आणून पर्समधील ४२ हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे नेकलेस, ३३ हजार रुपये किमतीचे झुंबर जोड, २० हजार रुपये किमतीचे कानातील वेल, ४५ हजार रुपये किमतीचे ९ ग्रॅमचे काळ्या मण्याची पोत चोरून नेली.

बातम्या आणखी आहेत...