आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीतील आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार (५ आॅगस्ट)पासून जिल्ह्यात सुरतसह इचलकरंजी येथून तिरंगा ध्वज उपलब्ध हाेणार आहेत. या तिरंगा ध्वजाचा आकार २० बाय ३० व १८ बाय २७ इंच असा असणार आहे. हे तिरंगा ध्वज १० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ९३ हजार नागरिकांना मिळणार आहेत. १३ ऑगस्टला नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा फडकवावा, ताे १५ ऑगस्टला सूर्यास्ताला उतरवावा. सरासरी २२ ते ३० रुपये प्रतिनग हा तिरंगा झेंडा असेल.
जिल्ह्यात प्रत्येक शासकीय-निमशासकीय व खासगी आस्थापना तसेच सहकारी व शैक्षणिक संस्थांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज उभारावा. नागरिकांनाही घरांवर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनाेद शर्मा यांनी केले.
काटेकोरपणे नियम पाळा, येथे मिळणार तिरंगा ध्वज
1 राष्ट्रध्वज हा हाताने कातलेल्या आणि विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क, खादीपासूनच्या कापडाचे असणे बंधनकारक आहे.
2 प्लास्टिक ध्वज वापरू नये, याची कटाक्षाने खबरदारी घ्यावी. जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता घ्यावी व त्यासाठी जाणीवजागृती करावी.
3 शहरी भागात पालिका, नगरपंचायती, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, स्वस्त भाव धान्य दुकाने या ठिकाणी राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
महिला बचत गटाचे केंद्र
बीड पंचायत समितीत राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या वेळी सीईओ अजित पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानोबा मोकाटे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) डॉ. दयानंद जगताप, तहसीलदार सुहास हजारे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप आदी उपस्थित होते. ‘उमेद’चा तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती बीडअंतर्गत सिमरन महिला स्वयंसहायता गट, पेंडगाव यांनी विक्री केंद्र सुरू केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.