आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यात्म:मानवी मनाचा क्रमबद्ध विकास हाच खरा धर्म : शिवाचार्य महाराज

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शिवनाम सप्ताह व श्री परमरहस्य ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात

धर्म हा आचरणासाठी असतो, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, जप व ध्यान यांचे आचरण म्हणजे धर्म होय. धर्माचरण केल्यामुळे व्यक्तित्वाचा विकास होतो. मानवी मनाचा क्रमबद्ध विकास हाच खरा धर्म, असे प्रतिपादन बाल तपस्वी सच्चिदानंद सद्गुरु ष.ब्र.१०८ चन्नबसव गुरु महालिंग शिवाचार्य महाराज यांनी केले.

जगद्गुरु रेणुकाचार्य जयंतीनिमित्त मठ संस्थान बर्दापूर येथे अखंड शिवनाम सप्ताह व श्री परमरहस्य ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात पार पडला. गुरु चन्नबसव शिवाचार्य महाराज यांच्या मिरवणुकीनंतर झालेल्या धर्मसभेत, त्यांची राजकुमार खोबरे यांनी भस्म तुला, महालिंगेश्वर महिला भजनी मंडळ यांनी श्रीफळ तुला तसेच शिवहर बिडवे, सुरेश हरंगुळे, व व बालाजी बागल यांनी साखर तुला केली.

ते म्हणाले, व्यक्तित्व विकसित झाल्यामुळे समाजाचे कल्याण साधते. जिवाचा अध्यात्मिक विकास होऊन त्याला शिवभा व प्राप्त व्हावा म्हणून षट स्थलाचे आचरण करावे. प्रपंच या विषयी अहंकार हा अशुद्ध अहंकार आहे व परमार्था विषयी शिवा विषयी अहंकार हा शुद्ध अहंकार आहे, शिवनाम सप्ताह मध्ये भजन परमरहस्य पारायण किर्तन यामुळे मन शुद्ध होते, तुम्हाला संतांची संगत लाभते, संत सजनाच्या संगतीने अंतकरण शुद्ध होते हेच जगद्गुरु रेणुकाचार्य यांनी सांगितले ते आपण आचरणात आणले पाहिजे, असे श्री सद्गुरू गुरु चन्नबसव शिवाचार्य महाराज म्हणाले.

दुसऱ्या दिवशी प्रसादाचे कीर्तन श्री सद्गुरु ष.ब्र.ष.१०८काशिनाथजी शिवाचार्य महाराज पाथरी यांचे झाले, त्यांनी प्रसादाचे महत्त्व सांगितले, गुरु वर आपली नितांत श्रद्धा असावी, म्हणजे आपल्याला मार्ग सापडतो असे त्यांनी सांगितले, शेवटच्या दिवशी महाप्रसाद अन्नदाते निलकंठ लक्ष्मणराव पाटील शिवनी हे होते, या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शंकर स्वामी जायफळकर, सल्लागार विश्वस्त मंडळाचे संचालक शिवशंकर नागनाथ अप्पा बिडवे तत्तापूर, बालाजी बाबुप्पा बागल ,कोळकानडी रामेश्वर महेश्वर आप्पा महाजन सोनपेठ तसेच शिवराज चिल्लर गे, मन्मथ धुमाळ, प्रल्हाद वागंसकर, अतुल महाजन, अंगद नाना जानकर, यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद गुळवे यांनी तर आभार प्रदर्शन रेवणसिद्ध हिरेमठ यांनी केले, या कार्यक्रमासाठी तत्तापूर, राडी ,आडस ,जायफळ ,वरवंटी, सामनगाव, मसला, कोळकानडी, चाटा ,बिटरगाव, नागझरी या परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...