आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्कार:दोन मुलींनी स्मशानभूमीत जाऊन पित्याला दिला मुखाग्नी ; वृध्दापकाळाने पित्याचे निधन

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृध्दापकाळाने पित्याचे निधन झाले. परंतु भाऊ नसलेल्या दोन मुलींनी आपल्या पित्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जाऊन पित्याच्या चितेस मुखाग्नी दिला.बीड येथील नानासाहेब देशमुख यांचे वृद्धापकाळाने सोमवारी सकाळी निधन झाल्यानंतर त्यांच्या दोन मुलींनी स्मशानभूमीत जाऊन पित्याच्या चितेस मुखाग्नी दिला.

बीड तालुक्यातील खडकीघाट येथील रहिवासी असणारे नानासाहेब देशमुख यांना कमलाक्षी ,मीनाक्षी आणि योगेश्वरी या तीन मुली. वृद्धापकाळात तीनही मुलींनी वडिलांची सेवा केली. मागील वर्षापासून नानासाहेब देशमुख हे दुर्धर व्याधीने आजारी होते. सोमवारी सकाळी त्यांचे बीड येथे निधन झाले. सायंकाळी साडेपाच वाजता नानासाहेब देशमुख यांची अंत्ययात्रा शहरातील अमर धाम स्मशानभूमीत पोहाेचली. त्यांना मुलगा नसल्याने मुखाग्नी कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला होता. मुलगी कमलाक्षी विवेक पारगावकर, मीनाक्षी सुनील महाजन या दोन बहिणी आणि पुतण्या केदार देशमुख यांच्या सोबत पित्याला मुखाग्नी दिला.

बातम्या आणखी आहेत...