आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंचपूर येथील घटना:धारुर तालूक्यात मोटरसायकलसह दोघे वाहून गेले; एकाचा रात्री तर दुसऱ्याचा सकाळी मृतदेह सापडला

धारूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर तालूक्यातील चिंचपूर येथील पुलावरुन दुचाकीवर जात असलेले दोघे जण वाहून गेल्याची घटना घडली होती. दरम्यान, त्यातील दोघा जणांचे मृतदेह सापडले आहेत. रात्री पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरुन जाणारे दोघे वाहून गेले होते. ग्रामस्थांनी रात्री महादेव सोनवने वय 45 वर्ष यांचा मृतदेह शोधला असून दुसऱ्याचा शोध सुरु होता.

धारुर ते चिंचपूर रस्त्यावर खारीचा पुल म्हणून ओळखला जाणाऱ्या ओढ्याला काल अतिवृष्टीमुळे पुर आला होता. रात्री या पुलावरुन केज तालुक्यातील उंदरी येथील महादेव सोणवने व उत्तम सोणवने आपल्या दुचाकी क्र. एम.एच. 44 एन. 7829 वरुन जात होते. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह दोघे वाहून गेल्याची घटना घडली आहे.

यात एकजण दुचाकीला अडकून राहील्याने एकाचा मृतदेह सापडला होता, तर दुसऱ्याचा एक किमी अंतरावर सकाळी 9 च्या सुमारास मृतदेह सापडला. घटनास्थळी धारुर पोलिस व ग्रामस्थांनी रात्री मदतकार्य सुरु केले. सदरील पुल हा नेहमीच पावसात पाण्याखाली जातो. हा परिसर वाण नदीचे पाणलोटक्षेत्र असून खारी म्हणून ओळखला जातो. या ओढ्याला पाणी आल्यावर तासन् तास वाहतूक खोळंबते.

बातम्या आणखी आहेत...