आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी विकास पॅन:पाडळी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत‎ जनशक्ती शेतकरी विकास पॅनलची बाजी‎

शिरुर‎3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरुर‎ तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुक पार पडत असून ‎पाडळी येथे सेवा सहकारी सोसायटीमध्ये जनशक्ती शेतकरी विकास ‎पॅनलचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले. सेवा सहकारी सोसायटीच्या‎ या विजयाचा जल्लोष पाडळी ग्रामस्थांनी साजरा केला.‎ राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजप, शिवसेना, शिवसंग्राम या पक्षातील ‎प्रतिष्ठित एकत्र येऊन शेतकरी विकास पॅनल व जनशक्ती शेतकरी‎ विकास पॅनल अशी लढत सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकात‎ झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विद्यमान सरपंच रामदास हंगे ‎ ‎ विरुद्ध गावातील इतर पक्षातील प्रतिष्ठित पुढारी अशी लढत झाल्याने या‎ निवडणुकात मोठी रंगत आली होती विद्यमान सरपंच यांच्या विरोधात‎ १३ पैकी १३ उमेदवार निवडून आणून जनशक्ती शेतकरी विकास पॅनलने‎ दणदणीत विजय प्राप्त केला आहे.‎

अतिशय चुरशीच्या निवडणुकीत समाधान इंगळे, रामकृष्ण कंठाळे,‎किरण चव्हाण, भगवान पाखरे, भीमराव पाखरे, नवनाथ सानप, प्रभाकर‎ हंगे, रामदास हंगे ,संगीता कंठाळे, अश्रुबा धनगुडे, विठ्ठल‎ सरवदे,बाबासाहेब आवंतकर या उमेदवारांनी विजय प्राप्त केला आहे.‎ पाडळी सेवा सहकारी सोसायटीमध्ये एकूण ५५० मतदान असून यामध्ये‎ सेवा सहकार सोसायटीची निवडणूक पार पडली.‎

बातम्या आणखी आहेत...