आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तास केला पाठलाग:पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्यांचा डाव फसला

केज15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मांजरसुंबा रस्त्यावरील सारूळ पाटीजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिस घटनास्थळी पोहोचल्यामुळे डाव फसला. मात्र पोलिसांनी तीन तास पाठलाग करून ही दरोडेखोर हाती लागले नाहीत. ठाण्याचे कर्मचारी शुक्रवारी रात्री गस्त घालीत होते. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास केज - मांजरसुंबा रस्त्यावरील सारूळ पाटीजवळ एका पांढऱ्या रंगाच्या कारजवळ पाच ते सहा दरोडेखोर हे काठी, कोयते, दगड हातात घेऊन रस्त्याच्या कडेला उभे असल्याची माहिती केज पोलिस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस शंकर वाघमोडे यांना मिळाली. त्यावरून जमादार बापू देवकते, जमादार चाँद शेख, पोलिस नाईक बाळासाहेब अहंकारे, पोलिस नाईक त्रिंबक सोपणे, फड, शाह देव म्हेत्रे, चालक हनुमंत गायकवाड यांच्या पथकाने दरोडेखोर थांबलेल्या ठिकाणाकडे धाव घेतली. मात्र पोलिसांना पाहून ते कारमध्ये बसून पळून गेले.

बातम्या आणखी आहेत...