आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांचे प्रतिपादन:धनसंपत्ती असण्यापेक्षा पुण्याईची श्रीमंती कधीही मोलाची

केज22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगामध्ये धनसंपत्तीने गर्भश्रीमंत असलेल्या लोकांची काही कमतरता नाही. परंतु खऱ्या अर्थाने धनवान तोच ज्याच्याकडे पुण्याईची श्रीमंती आहे. आज या ठिकाणी असाच पुण्याईची अफाट श्रीमती असणारा भक्त म्हणजे विष्णू घुले यांचे नाव घेताना मोठा आनंद होत आहे. घुले यांनी स्वखर्चातून माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० भाविकांना तिरुपतीचे दर्शन घडवून सुखरूप परत आणले आहे. ही बाब निश्चितच माझ्यासह इथे उपस्थित सर्वांसाठी मोठी कौतुकास्पद आहे, असे भावोद‌्गार खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी टाकळी ( ता. केज ) येथे काढले.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपचे युवानेते आणि टाकळीचे सरपंच विष्णू घुले यांनी ज्या भाविकांना दर्शनासाठी खर्च करणे शक्य नाही अशा ५०० भाविकांसाठी मोफत तिरुपती बालाजी दर्शन यात्रा घडवली. यात्रेहून परत आल्यानंतर मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या उद्यापन कार्यक्रमात खासदार डॉ. मुंडे या बोलत होत्या. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, भाजपचे नेते रमेश आडसकर, पंचायत समितीच्या सभापती परिमळा विष्णू घुले, जिल्हा उपाध्यक्ष सुनील गलांडे, माजी जिल्हा सदस्य संतोष हांगे, डॉ. योगिनी थोरात, जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारून इनामदार, नगराध्यक्षा सीता बनसोड, डॉ. वासुदेव नेहरकर, मुन्ना फड, धारूरचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, भगवान केदार, दत्ता धस, सुरेंद्र तपसे, संदीप पाटील यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना खा.प्रीतम मुंडे म्हणाल्या की, जगामध्ये अमाप धनसंपत्ती असलेले गर्भ श्रीमंत लोकांची कुठेही कमतरता नाही. परंतु खरा धनवान आणि गर्भश्रीमंत कोण असेल तर तो म्हणजे पुण्याईची श्रीमंती कमविणाऱ्यालाच सर्वश्रेष्ठ मानले जाते. विष्णु घुले यांनी देखील अशीच पुण्याईची अफाट श्रीमंती कमवली आहे. यावेळी इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. चिंचोलीमाळी जिल्हा परिषद गटातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमनसह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...