आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:पाडळी सेवा सोसायटीतील विजयी‎ जनशक्ती पॅनलचा भाजप जिल्हा‎ कार्यालयात मस्केंच्या वतीने सत्कार‎

बीड‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूर तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी‎ पाडळी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक‎ नुकतीच पार पडली. या निवडणुकीत आमदार संदीप‎ क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी –‎ काँग्रेसच्या पॅनलचा धुव्वा उडाला. एकूण पाचशे‎ मतदान असलेल्या या सोसायटीत जनशक्ती पॅनलने‎ एक संचालक बिनविरोध काढला तर १२ संचालक‎ शंभर मतांची आघाडी घेऊन विजयी ठरले.‎

बीड विधानसभा मतदारसंघातील बहुचर्चित‎ पाडळी सेवा सहकारी सोसायटी जनशक्ती विकास‎ पॅनलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार भाजप‎ जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सोमवारी (ता.१२‎ डिसेंबर) संघर्ष योध्दा भाजप जनसंपर्क कार्यालय‎ बीड येथे केला. विजयी उमेदवार भगवान पाखरे,‎ किरण चव्हाण, समाधान इंगळे, नवनाथ सानप,‎ नारायण हांगे, रामकृष्ण कंठाळे, प्रल्हाद धनगुडे,‎ रामदास हांगे या उमेदवारांचा सत्कार करून शुभेच्छा‎ देण्यात आल्या. यावेळी विवेक पाखरे, विठ्ठल‎ कंटाळे, माऊली शिरसाठ, देविदास कंठाळे, के.डी.‎ पाखरे, शांतिनाथ डोरले, महादेव जमाले, महेश‎ सावंत आदी उपस्थित होते. मस्के यांनी याप्रसंगी‎ विजयी संचालकांना पुढील वाटचालीसाठी‎ शुभेच्छाही दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...