आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूूक:महिलेने तान्हुल्यासह भरला सरपंचपदाचा अर्ज

धनंजय आढाव | परळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन आठवड्यांपूर्वी प्रसूत झालेल्या महिलेने सासरचे सरंपचपद महिलेसाठी आरक्षित झाल्याने कुुटुंबीयाच्या आग्रहास्तव माहेर ते सासर असे १३७ किलोमीटर अंतर रुग्णवाहिकेने कापत थेट परळीच्या तहसील कार्यालयात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता दाखल झाली. तान्ह्या बाळाला हातावर घेत तिने वानटाकळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदाचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परळी तालुक्यात ८० ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालेली असून शुक्रवार, २ डिसेंबर २०२२ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक गावात सरंपचपद महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे कुटुंबातील महिलांना सरपंचपदासाठी अर्ज भरण्यासाठी कुटुंबीयाकडून गळ घातली जात आहे. परळी तालुक्यातील वानटाकळी गावातही ग्रामपंचायतीची निवडणूक असून गावचे सरपंचपद महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे पल्लवी नाथ माने (२१) या महिलेने सरपंचपदासाठी आपला अर्ज दाखल करावा असा निर्णय तिच्या नातेवाइकांनी घेतला होता.

तीन आठवड्यांपूर्वी प्रसूत झालेली पल्लवी ही उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे माहेरी होती. दरम्यान, शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमरगा येथून ती एका रुग्णवाहिकेने सकाळीच निघाली. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ती परळी तहसील कार्यालयात पोहोचली. उमरगा ते परळी असे १३६ किलोमीटरचे अंतर रुग्णवाहिकने कापत ती परळी शहरात शुक्रवारी सकाळी पोहोचली. त्यानंतर तिने सरपंचपदाचा अर्ज दाखल केला. यावेळी तिच्यासमवेत पती नाथ माने, सासरे सखाहरी माने, संजय आजले आदी उपस्थित होते.

तान्हुल्याची प्रकृती सुधारल्यावर घेतला निर्णय २१ वर्षे वय असलेली पल्लवी माने हिची ७ नोव्हेंबर २०२२ रोजी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली. तुने मुलीला जन्म दिला. परंतु तिच्या मुलीची प्रकृती खालावल्याने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात बाळाला दाखल करण्यात आले होते. सदरील बाळावर पंधरा दिवस उपचार करण्यात आले. बाळाची प्रकृती सुधारल्यांनतर दोन दिवसांपूर्वी बाळाला आईकडे देण्यात आले होते. त्यानंतर पल्लवी आपल्या माहेरी उमरगा येथे गेली होती.

बातम्या आणखी आहेत...