आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:चारित्र्यावर संशय घेऊन महिलेस केली मारहाण

केज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारित्र्यावर संशय घेत एका महिलेस तिच्या पतीने नाकाला चावा घेतला. सासऱ्याने वेळूच्या काठीने व दगडाने तर सासूने केसाला धरून खाली पाडत चापटाबुक्याने मारहाण केल्याची घटना उत्तरेश्वर पिंपरी (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

उत्तरेश्वर पिंपरी येथील पूनम अशोक शिंदे (२४) या महिलेस दोन मुले, एक मुलगी अशी तीन अपत्य असून ११ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास रोहित भागवत शिंदे यास बोलत होती. हे पाहून तिचा पती अशोक उद्धव शिंदे याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तुझे नाक कापतो असे म्हणत पूनम हिच्या नाकाला चावा घेऊन जखमी केले.

तर सासरे उद्धव शिंदे याने वेळूच्या काठीने पायावर व पाठीवर मुक्कामार दिला. गमज्यात दगड बांधून तोंडावर मारला. तर सासू सुनीता शिंदे हिने केसाला धरून खाली पाडत चापटाबुक्याने मारहाण केली. अशी फिर्याद पूनम शिंदे हिने दिल्यावरून पती अशोक शिंदे, सासरा उद्धव शिंदे, सासू सुनीता शिंदे या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...