आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड कोरोना:परळीच्या महिलेस कोरोनामुक्त म्हणून मिळणार हाेती सुटी, त्याच दिवशी मृत्यू

बीड10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माळेगावात कंटेनमेंट झोन घोषित; पूर्णवेळ संचारबंदी लागू, कलेक्टरचे आदेश
  • जिल्ह्यात आतापर्यंत चौथा बळी 56 वर्षीय महिलेचा औरंगाबादमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

परळी शहरातील जगतकर गल्ली भागातील रहिवासी महिलेचा गुरुवारी पहाटे औरंगाबादमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. बुधवारीच या महिलेला कोरोनामुक्त म्हणून सुटी देण्यात येणार होती. मात्र, तेव्हाच या महिलेची प्रकृती खालावली आणि गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींचा आकडा यामुळे चारवर पोहोचला आहे. परळी शहरातील एका ५६ वर्षीय महिलेला किडनीशी संबंधित विकार असल्याने उपचारासाठी तिला औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. ४ जून रोजी ही महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे परळीच्या जगतकर कॉलनी भागात कंटेनमेंट झोन जाहीर केेलेला होता. दरम्यान, या महिलेला किडनी विकाराबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास होता. शिवाय, तिला न्यूमोनिया झाला होता. तरीही कोरोनाच्या उपचारांना या महिलेने प्रतिसाद दिला होता. त्यामुळे बुधवारी त्यांना कोरोनामुक्त म्हणून रुग्णालयातून सुटी देण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने हालचाली सुरू केल्या होत्या. बीडच्या आरोग्य विभागालाही याबाबत कळवले गेले होते. मात्र, रुग्णालयातून सुटी होण्याच्या वेळीच महिलेची प्रकृती गंभीर झाली आणि गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान तिचे निधन झाले.

३६ स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह, बीडकरांना मिळाला दिलासा
गुरुवारी जिल्हा आरोग्य विभागाकडून बीड जिल्हा सामान्य रुग्णालय, बीड कोविड केअर सेेंटर, उपजिल्हा रुग्णालय गेवराई, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय येथून मिळून एकूण ३६ स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेकडे पाठवले होते. गुरुवारी दुपारी ४ वाजता सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

आतापर्यंत येथील चार व्यक्तींचे गेले बळी : आतापर्यंत जिल्ह्यात पाटण सांगवी (ता. अाष्टी) येथे नातेवाइकाकडे आलेल्या नगर जिल्ह्यातील महिलेचा, मातावळी (ता. केज) येथील महिलेचा, मातावळी (ता. अाष्टी) येथील तरुणाचा आणि आता परळी शहरातील या महिलेचा असे एकूण चार जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.

महिलेच्या मृत्यूमुळे परळी शहरात खळबळ
कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूमुळे परळी शहरात खळबळ उडाली आहे. यापूर्वीच या महिलेच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब घेऊन ते तपासले गेले आहेत. महिलेच्या मृत्यूनंतर तालुक्यातील आरोग्य विभाग आणखी कामाला लागल्याचे चित्र आहे. संबंधित परिसर सॅनिटाइज करण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
आणखी सात जण कोरोनामुक्त : जिल्ह्यात गुरुवारी आणखी सात जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये मालेगाव (ता. गेवराई) येथील एक, आंबेवडगाव (ता. धारूर) येथील एक, तर बीड शहरातील मसरत नगर भागातील तीन जणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७२ इतकी झाली आहे.

माळेगावात कंटेनमेंट झोन घोषित; पूर्णवेळ संचारबंदी लागू, कलेक्टरचे आदेश

प्रतिनिधी | केज

तालुक्यातील माळेगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबातील चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हे गाव कंटेनमेंट झोन घोषित करून पूर्णवेळ संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालावरून जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून माळेगाव येथे कंटेनमेंट झोन घोषित केले. येथे पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे. आरोग्य विभागाकडूनही गुरुवारी सकाळपासूनच ३७६ कुटुंबांचे चार पथकांकडून सर्वेक्षण सुरू केल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...