आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूल्य:संविधानाचे मूल्य जोपासण्याचे काम शारदाच्या हातून घडतेय

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व जातीधर्माच्या पलीकडे जाऊन शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान गुरुजणांचा गौरव करताना संविधानाचे मूल्य जोपासले आहे. ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांनी उभारलेल्या संस्थेत आणि शिवछत्र परिवाराने आयोजिलेल्या विविध सामाजिक उपक्रमात आपल्या कलागुणांनी रंग भरण्याचे काम येथील शिक्षकांनी केले आहे, असे गौरवोद्गार साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

शारदा प्रतिष्ठानच्या चौदाव्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण सोमवारी (५ सप्टेंबर) शिक्षक दिनाच्या औचित्याने र. भ. अट्टल महाविद्यालयात करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित, जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, युवा नेते रणवीर पंडित, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन काळे, भवानी अर्बन बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, जयभवानी कारखान्याचे व्हा. चेअरमन जगन्नाथ शिंदे, माजी सभापती पाटीलबा मस्के, गटशिक्षणाधिकारी पंडित गोपाळघरे, निवड समितीचे अध्यक्ष नारायण मोटे उपस्थित होते.

अमरसिंह पंडित म्हणाले की, प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत तालुक्यावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी काम केले. जलसंधारणाबरोबरच चारा छावण्या सुरू केल्या. शेतकरी व सर्वसामान्य जनतेला साथ दिली. तालुक्यात गुणवत्तेला कमी नाही, त्यासाठी शिक्षण असो की क्रिडा त्यावर काम चालू आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शारदा अकॅडमी सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...