आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:जिल्ह्यातील क्षयरोग निर्मूलनाचे कार्य कौतुकास्पद ; अंबाजोगाईत अधिकाऱ्यांची बैठक

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यात माजी सैनिकांसाठी होत असलेले काम व क्षयरोग निर्मूलनासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सुरुवातीला अंबाजोगाई येथे व नंतर परळीला भेट दिली.

अंबाजोगाईच्या शासकीय विश्रामगृहावर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बैठक घेतली. या वेळी त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले. या वेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी माजी सैनिकांसाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. माजी सैनिकांना शासकीय व इतर क्षेत्रातील संधी उपलब्ध करून दिले जात आहेत असे त्यांनी सांगितले. जिल्हा सैनिक कार्यालयाचे संजय देशपांडे यांनी माहिती सादर केली. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची माहिती दिली.

या बैठक प्रसंगी अपर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तहसीलदार अंबाजोगाई बिपिन पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब लोमटे उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्ह्यात चांगले काम होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशपातळीवर सुरू केलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातदेखील घरोघरी सर्व्हेबरोबरच शिबिरेदेखील आयोजित करण्यात आली आहेत.

परळीत प्रभू वैद्यनाथाचे घेतले दर्शन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन पूजा केल्यानंतर त्यांच्या हस्ते महाआरती केली. मंदिर व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गिरिधारी भराडिया, सचिव अॅड. शरद लोमटे, सदस्य डॉ.संध्या जाधव, राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्राध्यापक अशोक लोमटे, पूजा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार देवीची प्रतिमा व शाल देऊन राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. तर परळी येथील प्रभू वैद्यनाथास कोश्यारी यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, परळीचे तहसीलदार सुरेश शेजूळ, श्री वैजनाथ देऊळ समितीचे अध्यक्ष राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...