आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादररोज सकाळी ठीक पावणेदहा वाजता पाटोदा नगरपंचायतीच्या मुख्य सभागृहात सर्व कर्मचारी एकाच ड्रेस कोडमध्ये गळ्यात ओळखपत्रांसह हजर दिसले. काही क्षणातच शिस्तबध्द पध्दतीने उभे राहत राष्ट्रगीत म्हटले गेले. पाटोदा नगरपंचायत कार्यालयात नवीन वर्षात लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी कार्यालयीन कामकाजात सकारात्मक बदल करण्यास सुरुवात केल्याने हे चित्र दिसून आले.
मागील काही वर्षांपासून पाटोदा नगरपंचायत मध्ये नियमित मुख्याधिकारी नसल्यामुळे नगरपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजात एक प्रकारचा शिथिलपणा आला होता. याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या कामकाजावर जाणवत होता. साधारणतः एक ते दीड महिन्यांपूर्वी पाटोदा नगरपंचायत चे नियमित मुख्याधिकारी म्हणून चंद्रकांत चव्हाण यांनी पदभार स्वीकारला. अवघ्या काही दिवसातच त्यांनी कामात सुसुत्रता आणली. कार्यालयीन कामकाज नेमून दिलेल्या वेळेतच कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेच पाहिजे, अशा प्रकारचा शिरस्ता त्यांनी घालून दिला.
२ जानेवारीपासून दररोज सकाळी ९:४५ वाजता सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्रासह हजर राहणे बंधनकारक केले. यासह नियमित राष्ट्रगीत होणार आहे. कामाकाजातही नागरिकांची कुठेही अडवणूक होऊ नये, यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी अशा कडक सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. या उपक्रमाच्या प्रारंभी सीओ चंद्रकांत चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक प्रल्हाद वक्ते, अभियंता ज्ञानेश्वर मिसाळ, अक्षय कदम, महेश भाकरे, विठ्ठल रूपनर, काकासाहेब जाधव, श्रीनिवास राऊत, सुनील शिंदे, आबासाहेब जाधव, संतोष झलपे या कर्मचाऱ्यांसह सुशील ढोले, अंगद सांगळे, अरुण पवार, रियाज सय्यद व नागरिकांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.