आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता:तरुणी झाली बेपत्ता;‎ दागिने, पैसेही गायब‎

केज22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज‎ तालुक्यातील एका गावातून एक २१‎ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली असून‎ घरातील दोन तोळ्याचे सोन्याचे‎ दागिने आणि एक लाख रुपयांची‎ रक्कम गायब झाल्याची घटना‎ उघडकीस आली. तरुणीच्या‎ वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांत‎ मिसिंगची नोंद करण्यात आली‎ आहे.‎ तालुक्यातील एका गावातील २१‎ वर्षीय तरुणीचे वडील हे ६ जानेवारी‎ रोजी रात्री पिकाला पाणी देण्यासाठी‎ शेतात गेले होते.

तरुणी आणि तिची‎ आई या दोघी घरी होत्या. तरुणी‎ एका रुममध्ये अभ्यास करीत होती.‎ तर दुसऱ्या रूममध्ये तिची आई‎ झोपली होती. त्यानंतर रात्री ११.४५‎ वाजेच्या सुमारास पिकाला पाणी‎ देऊन वडील घरी आले असता‎ तरुणीच्या रूमचा दरवाजा उघडा‎ दिसल्याने वडिलांनी जाऊन पाहिले.‎ तर सदरची तरुणी रुममध्ये दिसून‎ आली नाही. शेजाऱ्यासह‎ नातेवाईकांकडे संपर्क केला असता‎ तिचा कुठे ही तपास लागला नसून‎ ती बेपत्ता झाल्याचे स्पष्ट झाले.‎ बेपत्ता झाल्यानंतर घरातील दोन‎ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि एक‎ लाख रुपयांची रक्कम गायब‎ असल्याचे निदर्शनास आले.‎ त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी‎ पाेलिसांत तक्रार दिली.‎

बातम्या आणखी आहेत...