आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलईडी दिवे:तरुणाने गावात बसवले एलईडी दिवे

दिंद्रूड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत ग्रामीण भागात शासन अनेक योजना राबवत असून देखील रात्रीच्या वेळी पथदिव्याअभावी गाव अंधारमय होते. त्यामुळे सामाजिक कार्याचा वसा जोपासत माजलगाव तालुक्यातील नाखलगाव येथील एका तरुणाने पुतण्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अख्ख्या गावात एलईडी लाइट बसवत अंधारात असलेल्या गावाला प्रकाशमय केले आहे.

तालुक्यातील नाखलगाव हे सधन गाव म्हणून सुपरिचित अाहे. विविध उपक्रमांसाठी हे गाव सतत चर्चेत असते, गावात विजेच्या फोनवर लाइट नसल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. त्यामुळे वाढदिवसाला अवाढव्य खर्च न करता गावासाठी योगदान देण्याचा मानस ठेवून येथील रमेश झोडगे या तरुणाने कुठल्याही सरकारी योजनेची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतःच्या स्वखर्चातून अख्ख्या गावातील विद्युत पोलवर जवळपास सव्वा लाख रुपये खर्च करत ४८ विद्युत खांबावर सौर पथदिवे बसवले. यामुळे त्यांनी आदर्श उभा केला आहे.

शनिवारी या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा झाला. या वेळी भाजपचे पांडुरंग झोडगे, सरपंच विठ्ठल गवळी, रामहरी शिनगारे, लक्ष्मण सोळंके, भागवत शेळके, विजेंद्र झोडगे अनिल उंचे आदी मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती. या एलईडी लाइटमुळे अंधारात असलेल्या अख्ख्या गावात प्रकाश पडणार असल्यामुळे नाखलगावकर ग्रामस्थांतून झोडगे परिवाराने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

गाव प्रकाशमान
दरम्यान, गावातील विद्युत खांबांवर एलईडी दिवे बसवल्यामुळे गाव प्रकाशमान झाले आहे. अंधाराचा सामना पूर्वी गावकऱ्यांना करावा लागत असे. मात्र, अशा प्रकारे उपक्रम राबवल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...