आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनी प्रगती:महामंडळाच्या योजनांचा लाभ घेत तरुणांनी प्रगती करावी

केज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणाशिवाय प्रगती साधता येत नसून दलित समाजातील तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिकले पाहिजे. तर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे. विविध महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेत अर्थसाहाय्यातून उद्योग, व्यवसाय करीत साधावी, असे आवाहन माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केले.

केज तालुक्यातील पिसेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्रुती जाधव, महादेव सुर्यवंशी, विठ्ठल वैरागे, रमेश पाटुळे, माजी सरपंच मच्छिंद्र लांडगे, पत्रकार रंजीत घाडगे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोपान लांडगे, उपाध्यक्ष रितेश लांडगे, नियोजन गणेश जाधव, दिपक लांडगे, महेश लांडगे, सुरज लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रुती जाधव म्हणाल्या की, आजच्या तरूण पिढीने अण्णा भाऊ साठे यांचे विचार आत्मसात करीत त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंबरी, लोकगीते, वाचली पाहिजेत. त्या मार्गाने कार्य केले पाहिजे. इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...