आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:हार्डवेअर, मशिनरीच्या दाेन दुकानांचे शटर तोडून चोरी

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वर्दळीचा असणाऱ्या जुना मोंढा भागातील एका हार्डवेअर व दोन मशिनरीच्या दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी काउंटर मधील तीन दुकानातील एकूण ९५ हजाराची रक्कम लांबवल्याची घटना शनिवारी (दि. ५) पहाटे घडली.

पवन ओमप्रकाश मुंदडा यांचे मुंदडा मशिनरी,प्रकाश शिवराज तातडे यांचे महावीर मशिनरी व सत्तेप्रेम गोरख आगे यांचे बजरंग हार्डवेअर नावाचे दुकान जुना मोंढा भागात आहे. चोरट्यांनी शनिवारी पहाटे दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी मुंदडा यांच्या मुंदडा मशिनरी दुकानातून ५३ हजार रुपये लंपास केले. दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर तोडून नुकसान केले.

तातेड यांच्या महावीर मशिनरीच्या ड्राप फोडून आतील २० हजार रुपये काढून घेतले. त्याचप्रमाणे आगे यांच्या बजरंग हार्डवेअरच्या दुकान फोडून गल्ल्यातील १९ हजार रुपये काढून घेतले.असा तिने दुकानातील एकूण ९५ हजार रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. दरम्यान चोरट्या विरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...