आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिन्यांची चोरी:परळी शहरातील मंडी बाजरातील सराफा दुकानात दहा लाख रुपयांची चोरी

परळी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मंडी बाजरातील सराफा दुकानात चोरट्यांनी सराफा दुकानाचे शटर वाकवून सोन्या चांदीच्या दहा लाख रूपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला गेला. शहरातील मंडीबाजरात जावेद भाई शेख यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला.दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे दुसऱ्या दिशेला वाकवले. सोने चांदीचे दहा लाख रूपये किंमतीचे दागिने चोरी करून पळ काढला.तसेच इतर तीन सराफा दुकाने शटर वाकवून चोरी केल्याचा प्रयत्न करण्यात आला. गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक सोनेराव बोडखे करत आहेत. या प्रकरणात तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...