आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिजोरी लंपास:पोलिसांच्या जुन्या उपविभागीय कार्यालयातच चोरी, तिजोरी लंपास

माजलगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जुन्या पोलिस उपअधीक्षक कार्यालयात चोरट्यांनी चॅनल गेटचे कुलूप तोडून कार्यालयातील जुन्या रेकॉर्डची नासधूस करत २० हजार रुपये किमतीची तिजोरी चोरून नेली. बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या बाजूच्या इमारतीत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे जुने कार्यालय आहे.

२०१७ रोजी या कार्यालयाचे स्थलांतर केसापुरी कॅम्प येथे पोलिस वसाहतीतील ग्रामीण ठाण्याच्या बाजूस झाले होते. तेव्हापासून हे कार्यालय बंद आहे. २२ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान ही चोरीची घटना घडली आहे.

पात्रुडमधून अॅपेरिक्षा चोरी
पात्रुड येथील जमीर इब्राहिम मोमीन यांनी आपल्या मालकीचा ॲपेरिक्षा (एमएच २१ एक्स १४१८) उभी केली होती. ती चोरट्यांनी चोरून नेली. पोलिसांत गुन्हा नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...