आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार:साहित्याच्या प्रसारासाठी ग्रामीण‎ साहित्य संमेलनांची नितांत गरज‎

परळी‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण मराठी साहित्याचा प्रसारासाठी‎ ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज आहे.‎ त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.‎ शासनानेही अशा ग्रामीण संमेलनांच्या‎ आयाेजनासाठी पुढाकार घेतला पाहिजे,‎ असे प्रतिपादन संमेलनाचे मुख्य संयोजक‎ डॉ.एकनाथ मुंडे यांनी केले.‎ पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय,‎ नाथरा येथे ६ व्या ग्रामीण मराठी साहित्य‎ संमेलनाचे उद‌्घाटन करण्यात आले.‎ याप्रसंगी ते बोलत होते. कवी डॉ.स्वप्नील‎ चौधरी, उपविभागीय अधिकारी नम्रता‎ चाटे यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन‎ झाले.

यावेळी नायब तहसीलदार रुपनर,‎ संस्थेचे सचिव डॉ.संतोष मुंडे,‎ कार्यक्रमाचे अध्यक्ष न.प.परळीचे माजी‎ नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख,‎ साहित्यिक नागनाथ बडे, प्रा विठ्ठल‎ जायभाय, राजेंद्र पाठक, डॉ.रमेशचंद्र‎ काबरा, सतिश बियाणी, सामाजिक‎ कार्यकर्ते भास्कर चाटे, ज्ञानेश्वर माऊली‎ लांब, पोलीस निरीक्षक मारोती मुंडे,‎ उपनिरीक्षक गणेश झाम्बरे, शुभांगी गित्ते,‎ कार्यवाहक मुख्याध्यापिका सुलेखा मुंडे‎ यांची प्रमुख उपस्थिती होती.‎ या साहित्य संमेलनाचा आरंभ‎ ग्रंथदिंडीने झाला. ज्यामध्ये प्रसिद्ध‎ साहित्यिक, शालेय विद्यार्थी यांनी विविध‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रकारच्या वेशभूषा करून महाराष्ट्राच्या‎ अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन घडवून‎ दिले. उदघाटनानंतर ग्रामीण मराठी‎ साहित्य क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात,‎ आरोग्य क्षेत्रात, कृषी क्षेत्रात, पत्रकारिता‎ क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य‎ करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना श्रीनाथ मानव‎ सेवा मंडळाच्या वतीने गौरवण्यात आले.‎ दुसऱ्या सत्रात डॉ.एकनाथ मुंडे यांच्या‎ ‘लिखित असावे आपुले घरटे छान’ या‎ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन‎ करण्यात आले.

डॉ.स्वप्नील चौधरी यांनी‎ हे साहित्य संमेलन कौतुकास्पद असून‎ यातून ग्रामीण लेखकांना प्रेरणा मिळेल,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असे सांगितले. या ६ व्या ग्रामीण मराठी‎ साहित्य संमेलनाच्या साहित्य रसाचा‎ आस्वाद घेण्यासाठी आणि या साहित्य‎ संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई,‎ अकोला, यवतमाळ, पंढरपूर, परभणी,‎ हिंगोली, गंगाखेड, सोनपेठ येथील‎ साहित्यिक, साहित्यप्रेमी, शालेय विद्यार्थी‎ आणि पालकांनी उत्स्फूर्त उपस्थिती‎ दर्शवली. सूत्रसंचालन महेश मुंडे यांनी‎ केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या‎ मुख्याध्यापिका सुलेखा मुंडे यांनी केले.‎

संपूर्ण महाराष्ट्राला कवितेने भारावून‎ टाकणाऱ्या डॉ.स्वप्नील चौधरी यांच्या‎ वतीने ‘चल दंगल समजून घेऊ’ ही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कविता सादर करण्यात आली. या‎ कवितेने उपस्थितांची मने जिंकण्यात‎ आली. मान्यवरांच्या मनोगतानंतर‎ दुपारच्या सत्रात घेण्यात आलेल्या कवी‎ संमेलनामध्ये उपस्थित साहित्यिक‎ नवोदित कवी, बालकवी, शालेय विद्यार्थी‎ यांनी आपापल्या कविता सादर करून‎ उपस्थित साहित्य रसिकांना भारावून‎ टाकले. अशा या ६ व्या ग्रामीण मराठी‎ साहित्य संमेलनाच्या साहित्य रसाचा‎ आस्वाद घेण्यासाठी आणि या साहित्य‎ संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी‎ मोठ्या संख्येने रसिक हजर होते.‎‎ उपस्थितांनी संमेलनाचे कौतुक केले.‎ नाथरा येथे ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी काढण्यात आली.‎

यांचा झाला गौरव‎ राजेंद्र पाठक, आत्माराम कुटे,‎ आत्माराम जाधव, स्वप्नील चौधरी,‎ सिंधुताई दहिफळे, संध्याराणी कोल्हे,‎ द.ल.वारे, नागनाथ बडे, डॉ.वसंत‎ सातपुते, डॉ.विठ्ठल जायभाय,‎ बा.बा.कोटमंबे, संजय राठोड, दत्तात्रय‎ महाराज आंधळे, प्रकाश घातगीणे,‎ विठ्ठल चव्हाण आदी मान्यवरांना‎ पुरस्काराने गौरविण्यात आले. बालाजी‎ टाक यांना उद्योग भूषण व आदर्श‎ शेतकरी म्हणून विठ्ठल साखरे व‎ श्रीनिवास मुंडे यांना कृषिमित्र पुरस्काराने‎ सन्मानित करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...