आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येते की सर्व यशस्वी व्यक्ती कठीण परिश्रम घेऊनच पुढे गेल्या आहेत. म्हणून विद्यार्थी जीवनात ही गोष्ट रुजवली पाहिजे की मेहनत घेऊनच यश मिळवले जाते, त्याला कुठलाही शॉर्टकट नसतो, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले. अंबाजोगाई येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे हे हजर होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संगीत विषयानुरूप सुमधुर कार्यक्रम सादर केला. त्यांनंतर इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘शिव तांडव’ नृत्य सादर केले. शाळेच्या वरिष्ठ समन्वयिका डॉ. रेणू झिरमिरे यांनी स्वागतपर भाषणातून कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाळेचे प्राचार्य किर्तीकुमार देशमुख यांनी मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी कलाशिक्षक महेश दुगम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचे पोर्ट्रेट तयार करीत उपस्थितांची वाहवा मिळवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.