आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य़ मराठी विशेष:शेतावर जाण्यासाठी रस्ता असावा; दोन वस्त्यांवरील ग्रामस्थांनी स्वखर्चाने केला पाणंद रस्ता

बीड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी रस्ता असावा व मजुरांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने सुरू केलेली मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे कामे पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे लिंबागणेश (ता. बीड) येथील जाधव-ढवळे वस्तीवरील ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून ५० हजार रुपये गोळा करून स्वखर्चाने पाणंद रस्ता सुरू करत जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

लिंबागणेश येथील जाधव वस्ती, ढवळे वस्ती, घाडगे वस्ती, वाणी वस्तीवरील पाणंद रस्त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेण्यात आला होता. त्याचबरोबर बीड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदने देत आवश्यक ती कागदपत्रे दिली होती. परंतु, पावसाळा सुरू झाला तरी शासकीय नियमांच्या कचाट्यात ही योजना सापडल्याने या योजनेचे वेगळेच वास्तव समोर आले. पाणंद रस्त्यांची कामे कागदावरच असून तांत्रिक बाबींमुळे हे काम सुरू झाले नाही. त्यामुळे शासनाच्या भरवशावर न थांबता आता पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून जाण्याची वेळ येऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वी ५० हजार रुपये वर्गणी गोळा करून ग्रामस्थांनी स्वखर्चाने रस्ते कामास सुरुवात केली आहे.

एक हजार मस्टर ऑनलाइन करायचेत
पाणंद रस्त्याचे एक हजार मस्टर ऑनलाइन करायचे राहिलेत. नागपूरहून याबाबत फोन येत आहे. सध्या काम थांबले असून ऑपरेटरला हे खाते ऑनलाइन करायचे सांगितले आहे. तालुक्यात जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत पाणंद रस्त्याचे काम सुरू राहील, असे सीईओंनी सांगितले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत हा विषय मार्गी लागेल.
-सचिन सानप, गटविकास आधिकारी, पंचायत समिती बीड.

विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये म्हणून हाती घेतले काम
सध्या पाणंद रस्ते पूर्ण झाले नसल्याने आता पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी तसेच आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी महिला व दूध उत्पादक शेतकरी यांचे हाल होतील. ही परिस्थिती ओळखून ग्रामस्थांनी मागील ५दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू केले आहे.
-डॉ. गणेश ढवळे, सामाजिक कार्यकर्ते, लिंबागणेश.

बातम्या आणखी आहेत...