आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लग्नात नव्हता घोडा मात्र अनोख्या प्रथेमुळे गर्दभ सवारी‎ ; विडेकरांनी काढली अविनाश करपे या जावयाची गाढवावरून मिरवणूक‎

केज‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुलीवंदनाच्या सणाला जावयाची‎ गाढवावरून मिरवणूक काढण्याची प्रथा‎ विडा (ता. केज) येथील गावकऱ्यांनी‎ कायम ठेवली. यंदाचा मान अविनाश करपे‎ (रा. जवळबन ता. केज) या प्रेमविवाह‎ केलेल्या जावई बापूंना मिळाला. त्यांनी‎ मंदिरात लग्न केल्यामुळे घोड्यावर बसता‎ आले नाही. मात्र या अनोख्या प्रथेमुळे‎ त्यांची गर्दभ सवारी झाली.‎ तालुक्यातील विडा या गावात १९९५‎ सालापासून जावयाची धूलिवंदनाच्या‎ दिवशी गाढवावरून मिरवणुक‎ काढण्याची प्रथा आहे. यंदा ही‎ धुलिवंदनाचा सण तोंडावर येताच गावात‎ स्थायिक असलेले दोनशेच्या वर असलेले‎ जावई हे भूमिगत झाले होते. दुसरीकडे‎ दोन दिवस अगोदर गावातील तरुणांनी‎ एकत्र येऊन जावई शोध समिती नेमली‎ होती.

पथकाच्या निशाण्या वरील‎ जावयांनी हुलकावणी दिल्याने बीड पर्यंत‎ गेलेली पथके मोकळ्या हाताने परत‎ आली होती. धूलिवंदनाच्या आदल्या‎ रात्रीपर्यंत जावई बापू हाती लागले‎ नसल्याने शोध सुरूच होता.‎ मध्यरात्री २ च्या सुमारास पथकाने जवळ‎ बन (ता. केज) येथे युवराज पटाईत यांचे‎ जावई अविनाश हरिभाऊ करपे हे गाढ‎ झोपेत होते. पथकातील तरुणांनी दरवाजा‎ वाजवला, ते दरवाजा उघडून बाहेर येताच‎ त्यांना गाडीत घालून विड्याला आणले.‎

सकाळपर्यंत ग्रामपंचायतीत नजरकैदेत‎ ठेवून पंचायती समोर चपलेचा हार‎ घातलेल्या गाढवावर विराजमान करण्यात‎ आले. मिरवणुकीला सुरुवात झाली. रंगाने‎ भरलेल्या बॅरल मधून त्यांच्यावर रंगाची‎ उधळण करीत पुढे ढोली, डीजेचे‎ गाण्याच्या तरुण मंडळी थिरकली.‎ वाजत-गाजत गावातील प्रमुख रस्त्यावरून‎ मिरवणूक सुरू असताना रस्त्याच्या दुतर्फा‎ घरांवर थांबलेल्या महिलांनी ही मिरवणूकी‎ वर रंगाची उधळण केली. शेवटी‎ मिरवणुकीचा ग्रामदैवत राजा हनुमान‎ मंदिरासमोर झाला.‎ मारुतीच्या पारावर लोकवर्गणीतून‎ जमलेल्या पैशांतून खरेदी केलेल्या‎ कपड्यांचा आहेर गावकऱ्यांच्या हस्ते‎ जावई करपे यांना देऊन सन्मान करण्यात‎ आला. सासरे युवराज पटाईत यांनी जावई‎ बापूंना सोन्याची अंगठीही भेट दिली.‎

विडा येथे जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्यात आली.‎ ६ वर्षांपूर्वी प्रेमविवाह,‎ आता मिळाला मान‎ जवळबन येथील अविनाश करपे‎ यांनी २०१६ साली विड्याचे‎ युवराज पटाईत यांच्या मुलीशी‎ उत्तरेश्वर पिंप्री येथील मंदिरात‎ प्रेमविवाह केला होता. प्रेम‎ विवाहामुळे त्यांना लग्नात‎ घोड्यावर बसता आले नव्हते.‎ मात्र धूलिवंदनाच्या सणाला‎ गाढवावरून जावयाची‎ मिरवणूक काढण्याच्या अनोख्या‎ परंपरेमुळे त्यांना गाढवावर‎ बसण्याचा मान मिळाला. तर‎ सासऱ्यांकडून सोन्याची अंगठी‎ ही भेट मिळाली.‎

बातम्या आणखी आहेत...