आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाववाढ:कापसाची प्रतीकात्मक होळी करून‎ बोंबा मारत व्यक्त केला तीव्र संताप‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

योग्य भाव मिळत नसल्याने‎ शेतकर्‍यांनी कापसाची साठवणूक‎ केलीआहे. असे असतानाही केंद्र व‎ राज्य शासनाकडून भाववाढी‎ संदर्भात कसलाही निर्णय घेत‎ नसल्याने शेतकरी अडचणीत‎ सापडला आहे. यामुळे शासनाच्या‎ निषेधार्थ कापसाची प्रतिकात्मक‎ होळी करुन बोंबा मारत शेतकरी नेते‎ गंगाभिषण थावरेंनी शासनाचा‎ निषेध केला.‎ जिल्ह्यात यावर्षी कापूस आणि‎ सोयाबीन यांना भाव नसल्याने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शेतकऱ्यांनी त्याची घरातच‎ साठवणूक करुन ठेवली आहे.‎ कांदा उत्पादक अडचणीत आला‎ असून योग्य भाव मिळत नसल्याने‎ गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शेतकऱ्यांनी माल बाजारात आणला‎ नाही. यामुळे बाजारातही मोठ्या‎ प्रमाणात मंदी आली आहे. भाव‎ नसल्याने शेतकरी अडचणित‎ सापडले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...