आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:चोरांचा शेतकऱ्यावर हल्ला; हातपाय बांधून फरफटत नेले, ओरडू नये म्हणून तोंडात कोंबला कपड्याचा बोळा

पाटोदा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा शेतकरी रात्री दीड वाजता आपल्या शेतातील फळबागाला पाणी देण्यासाठी जातांना चोरांनी त्याला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना तालुक्यातील पारगाव घुमरा येथे गुरुवारी मध्यरात्री घडली.

पारगाव घुमरा येथे मुख्य रस्त्यालगतच गाडेकर यांच्या घराच्या परिसरात मोबाइल कंपनीचे टॉवर आहे. गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मोबाइल टॉवरचे वायर, बटरी व इतर साहित्य चोरण्यासाठी सहा चोर आले होते. याच वेळी टॉवरच्या शेजारी राहणारे प्रशांत भोसले हा तरुण शेतकरी फळबागेला पाणी देण्यासाठी बोअरची मोटर सुरू करण्यासाठी घराबाहेर पडला. त्याला पाहताच चोरांनी त्याच्यावर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात भोसले यांच्या डोक्यात व डोळ्यावर जबर मार लागला. चोर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्याने आरडा ओरडा करू नये म्हणून भोसले यांच्या तोंडात कपड्याचे बोळे कोंबत त्यांच्या अंगातील जरकींनने त्यांचे पाय बांधून अर्धा किलोमीटरपर्यंत त्यांना फरफटत नेले. पुन्हा मारहाण करून चोरांनी पोबारा केला. भोसले यांनी कशीबशी सुटका करून घेत गावात जाऊन ग्रामस्थांना जागे केले. मात्र तोपर्यंत चोर पसार झाले होते. या प्रकरणी प्रशांत भोसले यांचा तक्रारीवरून पाटोदा पोलिस ठाण्यात सहा चोरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पो.कॉ मेंगडे करत आहेत.

दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याची होतेय मागणी
पाटोदा तालुक्यात दिवसा वीज पुरवठा खंडित होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना फळबागांसह उन्हाळी पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागते. शेतकऱ्यांना चोरांचा धोका आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, आम्ही महावितरणकडे मागणी केली आहे. पद्माकर घुमरे, सरपंच, पारगाव घुमरा.

बातम्या आणखी आहेत...