आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:चोर गजाआड; 3 लाखांचा ऐवज जप्त

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सराफा लाइन भागात घरफोडी करून ३ लाख ८८ हजार रुपयांचे १२६ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला शहर पोलिसांच्या डीबी पथकाने गजाआड केले. पोलिस निरीक्षक रवी सानप यांनी ही माहिती दिली. चोरट्याकडून मुद्देमाल जप्त केला. बीड शहरातील सराफा लाइन भागात बोबडेश्वर गल्लीत राहणाऱ्या मंगल कृष्णकुमार कोळेकर यांच्या घरात २४ ऑगस्ट रोजी चोरट्यांनी प्रवेश करून ३ लाख ८८ हजार रुपयांचे १२६ ग्रॅम सोने लंपास केले होते. या प्रकरणी २५ ऑगस्ट रोजी शहर ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. एसपी नंदकुमार ठाकूर, एएसपी सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनात व पीआय रवी सानप यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे बाळासाहेब सिरसाट, मनोज परजने, अश्फाक सय्यद, अविनाश सानप यांनी या तपास केला. शेख कलीम शेख अलीम (२५, रा. दहिफळ ता. बीड) याला औरंगाबादेतून गजाआड केले. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...