आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:वडवणीत एकाच रात्रीत चोरांनी ४ दुकाने फोडली; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद पोलिस मागावर

वडवणी5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोरांनी एकाच रात्री शहरातील ४ दुकाने फोडल्याची घटना घडली. असून चोर सीसीटीव्ही कैद झाल असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले.

वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भानुदास मस्के यांच्या मालकीचे ओम हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून हॉटेलमध्ये प्रवेश करत चाेरट्यांनी गल्ल्यातील दोन लाख रुपये लांबवले. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झालेत. त्यानंतर शेजारीच बेकरी दुकानाचे कुलूप तोडले.त्यानंतर मुख्य रस्त्यावरील जिवाजी महाले चौकातील श्रीराम शेळकेंच्या मालकीच्या बद्रीनाथ शूज हाऊसच्या शटरचे कुलूप ताेडून गल्ल्यातील दीड हजार रुपये लांबवले.

त्यानंतर येथील पप्पू शेळके यांच्या आदर्श अॅग्रो एजन्सीमधील चार हजार रुपये चोरांनी लांबवले. त्यानंतर शहरातील चकोर जैन यांच्या मालकीचे कल्पतरू कलेक्शन या कापड दुकानाचे शटर कुलूप तोडले. परंतु, शटर वर न गेल्याने चोरी करता आली नाही. या ठिकाणीही चोर सीसीटीव्हीत कैद झालेत. त्यानंतर शहरातील पोलिस ठाण्याच्या आवारातून दिसणारे स्व. नाईक चौकातील विजय मायकर यांच्या मालकीचे न्यू बालाजी फर्निचरमधील २३ हजार चोरांनी लांबवत फॅनसह इतर इलेक्ट्रिकल वस्तू लांबवल्या.

बातम्या आणखी आहेत...