आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:दिंद्रुडमध्ये बाहेरगावी गेलेल्या लाइनमनचे चोरांनी घर फोडले

दिंद्रुड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सतीश रामचंद्र भोसले यांच्याकडे वास्तव्यास असलेले लाइनमन कल्याण सुरवसे हे पत्नीसह नागपंचमीच्या निमित्ताने सोमवारी सायंकाळी सिरसाळा (ता. परळी) येथे त्यांच्या भावाकडे गेले होते. दरम्यान, मध्यरात्री चाेरट्यांनी सुरवसेंच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाटात वसुली केलेले वीज बिलाचे २० हजार रुपये व दहा हजारांचे सोन्याचे दागिने चाेरट्यांनी लांबवले.

मंगळवारी सकाळी घरमालक भोसले यांच्या निदर्शनास हा चोरीचा प्रकार आल्यानंतर त्यांनी सुरवसेंना माहिती दिली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रात्री २ वाजेच्या सुमारास २ चोरांनी घरात प्रवेश केल्याचे दिसत आहे. याप्रकरणी दिंद्रुड ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास बीट अंमलदार पवार करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...