आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर फोडली:सातेफळ येथे एकाच रात्री चोरांनी तीन घरे फोडली

केज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ३९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील सीताफळ येथे घडली.

सातेफळ येथील श्रीहरी बाबुराव चंदनशिव हे मागील आठ दिवसापूर्वी घराला कुलूप लावून लातूरला गेले होते. २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. पत्नीच्या कानातील १० हजार रुपयांचे ५ ग्रॅमचे सोन्याचे झुंबर व २० हजार रुपयांच्या प्रत्येकी ५ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या नेल्या. त्यानंतर विशाल नरहरी थोरात यांच्या घरातील पेटी फोडून नगदी ४ हजार रुपये, २ हजार रुपयांची सोन्याची नथ व लक्ष्मीच्या सणासाठी आणलेले समान काढून घेतले. त्यानंतर भिवाजी वनवे यांच्या घरातील कपाट उघडुन ३ हजार रुपयांची रक्कम घेतले. चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, नगदी ७ हजार रुपये असा ३९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

बातम्या आणखी आहेत...