आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावांची तहान‎:जलजीवन योजनेतून भागणार 137 गावांची तहान‎

बीड‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या वतीने ग्रामीण भागात पिण्याच्या‎ पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जलजीवन‎ मिशन योजना राबवण्यात येत आहे. बीड‎ मतदारसंघातील अनेक गावांमध्ये‎ पिण्याच्या पाण्याच्या समस्या उद्भवत‎ असतात. त्यामुळे या गावांना या‎ योजनेअंतर्गत निधी मिळावा आणि‎ ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था‎ व्हावी, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त‎ क्षीरसागर यांनी केली होती. त्यांच्या या‎ मागणीला यश आले आहे. जल जीवन‎ मिशन अंतर्गत ११६.५४ कोटी रुपयांची कामे‎ होणार आहेत.

यामुळे बीड मतदार‎ संघातील १३७ गावांची तहान भागणार‎ आहे.‎ ८ सप्टेंबर २०२२ रोजी बीड मतदार‎ संघातील मेंगडेवाडी, मार्कडवाडी,‎ शहाबाजपुर, सुरडी थोट, धावज्याचीवाडी,‎ डिसलेवाडी, गंगनाथवाडी, वैतागवाडी,‎ खंडरस, कळसंबर, गवळवाडी, सफेपुर,‎ वानगाव, साखरे बोरगाव, पिंपरनई,‎ ताडसोन्ना, तागडगाव, नाळवंडी या‎ गावांच्या असे एकूण १६३३.२५ लक्ष‎ रुपयांच्या निविदा प्रकाशित झाल्या होत्या.‎ ६ ऑक्टोबर रोजी बीड तालुक्यातील‎ २४ कोटी १६ लक्ष रुपयांच्या निविदा‎ प्रकाशित झाल्या त्यामध्ये बेलेवाडी,‎ काकडहिरा, दहिफळ, गुंडेवाडी, भोरदेवी,‎ नागापूर, कोल्हारवाडी, पोठरा, मुर्शदपूर‎ घाट, मांडवखेल, कोळवाडी,‎ काठोटवाडी, हिंगणी, सावरगाव घाट,‎ तांदळ्याचीवाडी, वाकनाथपूर,‎ राक्षसभुवन, बेलापुरी, कुंभारी, कानडी‎ घाट, घोसापुरी, जिरेवाडी, वडगाव,‎ सौदाना, बाभळवाडी, बोरफडी, चिंचोली‎ या गावांचा समावेश होता तर, बीड मतदार‎ संघात मात्र शिरूर तालुक्यात असलेल्या‎ बरगवाडी, टाकळवाडी, वंजारवाडी,‎ घुगेवाडी, हटकरवाडी आव्हळवाडी,‎ मालकाचीवाडी, नागरेवाडी , धनगरवाडी‎ असे एकूण ७८१.९३ लक्ष रुपयांच्या निविदा‎ प्रकाशित झालेल्या आहेत.‎

क्षीरसागर यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे अाभार‎ २१ ऑक्टोबर व १७ नोव्हेंबर रोजीही काही गावांच्या निविदा प्रकाशीत‎ झालेल्या आहेत. बीड मतदार संघामध्ये एकूण १३७ गावांच्या‎ जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या नळ योजनेच्या कामासाठी‎ ११६५४.०५ लक्ष रुपयांच्या निविदा प्रक्रिया राबवल्या जात आहेत. माजी‎ मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मागणीला आणि विनंतीला मान देऊन‎ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल‎ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा‎ मंत्री गुलाबराव पाटील या सर्वांचे आभार बीड मतदारसंघातील जनता‎ मानत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...