आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तहानलेले खोकड विहिरीमध्ये पडले, सर्पराज्ञी व वन विभागाने बाहेर काढले; लवकर निसर्गात मुक्त करण्यात येणार, सृष्टी सोनवणेंची मागणी

शिरूर कासार14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात दिवसेंदिवस उष्णतेच्या झळा तीव्र होत आहेत. जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यजीवांचे हाल होत आहेत. पाण्याच्या शोधात लोक वस्तीकडे वन्यजीव धाव घेत आहेत. मात्र अन्नपाणी मिळवण्याच्या प्रयत्नात वन्यजीव संकटात सापडत आहेत. खालापुरी येथे पाच परस खोल विहिरीत एक खोकड पडले होते, त्यास सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र व वन विभागाच्या प्रयत्नातून नवजीवन मिळाले.

शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी येथे मुरलीधर लोंढे यांच्या पाच परस खोल विहिरीत एक खोकड पडले होते. लोंढे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीत खोकड पडल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश घोलप यांना दिली. घोलप यांनी सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे यांना या घटनेची माहिती दिली. सोनवणे यांनी वनरक्षक बद्रीनाथ परजणे यांना या घटनेची माहिती देऊन घटनास्थळी बोलावून घेतले. वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे व वनपाल साधू धसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणिमित्र सिद्धार्थ सोनवणे वनरक्षक बद्रीनाथ परजने हे दोरखंडाच्या साह्याने खोल विहिरीत उतरले. सोनवणे यांनी विहिरीत खोकडास पकडून पोत्यात टाकले व विहिरीच्या बाहेर काढले. खोकड विहिरीत पडल्याने जखमी व अशक्त झाल्याने त्यास सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी दाखल केले. लवकरच त्यास निसर्गात मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...