आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरण:ही आत्महत्या नव्हे, राज्य सरकारने केलेला खून , मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा : सदाभाऊ खोत

गेवराई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगणगावातील शेतकऱ्याने आत्महत्या केली नसून राज्य सरकारने हा खून केला आहे, असा आरोप शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

साखर कारखाना ऊस नेत नसल्यामुळे हिंगणगावातील शेतकरी नामदेव आसाराम जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. खोत यांनी शनिवारी सकाळी १० वाजता जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. खोत म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आम्ही एकत्र येऊन सरकारला अधिवेशनात उसाच्या संदर्भात काही गोष्टींची जाणीव करून दिली होती. त्यांनी मुद्दाम चालढकल केली. सरकारमधील बहुसंख्य मंत्री कारखानदार आहेत. त्यांनी त्यांच्या सोयीनुसार उसाचे गाळप केले. जे कारखाने वेळेत बंद झाले, अशा सर्व कारखान्याला मराठवाड्यातील ऊस घेऊन जाता येईल, अशी आर्जव ठाकरे सरकारला केली. मात्र, सरकार चांगल्या मनोवृत्तीचे नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी आमदार लक्ष्मण पवार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, माजी उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, अरुण चाळक आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...