आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सव:यंदा 30 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत होणार खंडेश्वरी नवरात्रोत्सव

बीड8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडचे ग्रामदैवत असलेल्या श्री खंडेश्वरी देवी येथील नवरात्रौत्सवास सोमवार (दि.२६) पासून उत्साहात प्रारंभ होत आहे. खंडेश्वरी देवी संस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यात ३० सीसीटीव्हींच्या निगरानीत नवरात्रोत्सव होणार आहे.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर या वर्षी प्रथमच श्री खंडेश्वरी देवीचा शारदीय नवरात्रोत्सवाची जोरात तयारी सुरू आहे. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मंदिरात घटस्थापना करुन उत्सवास सुरुवात होणार आहे. खंडेश्वरी मंदिरात बीडसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. पहाटे चार वाजल्यापासून दर्शन रांग सुरू होते. यामुळे मंदिर व परिसरात स्वच्छता करण्यात आली असून मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे.

भाविकांसाठी शद्ध पाण्याची व्यवस्था, ३० सीसीटीव्ही कॅमेरे विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. उत्सव काळात संस्थानच्या वतीने खासगी ५ महिला व २० पुरुष सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. तसेच पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड पोलिस स्टेशन, वाहतूक पोलिस यांचाही बंदोबस्त राहणार आहे. मंदिर परिसरात सर्व प्रकारचे स्टॉल, आनंदनगरी उभारण्याची तयारी सुरू आहे. ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त पहाटे चार वाजता श्री खंडेश्वरी देवीची महापूजा होऊन सकाळी सात वाजल्यपासून दर्शन सुरू होणार आहे. सायंकाळी सीमोल्लंघनानंतर ७.३० वाजता बीड वासियांचे आकर्षण असलेल्या ४० फुटी रावण दहन व आतषबाजीने नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. यात्रा महोत्सव पार पाडण्यासाठी मातासेवक तथा विश्वस्त राणा चौव्हाण, राजेंद्र बनसोडे, अंबादास गुरव, सम्राटसिंह चौव्हाण, बंडू खनाळ, राजेंद्र लोळगे, विकास गाडेकर, सुरेश बनसोडे, सुभाष श्रीवास्तव, आशिष राठौर, विकी चौव्हाण, पवण राजपुत, अभिजीत शिंदे, मंगल मोरे, किशन चौव्हाण आदी प्रयत्नशिल आहेत.

देवीला नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे
नवरात्रात नऊ रंगांना मोठे महत्व आहे. यामुळे श्री खंडेश्वरी देवीला नवरात्रातील नवरंगांप्रमाणे रोज वस्त्र परिधान केले जाणार आहे. अशा प्रकारे विविध सोन्या, चांदीच्या अलंकाराने सजलेल्या देवीचे मनमोहक रुप पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात.

असे आहेत दैनंदिन कार्यक्रम
नवरात्रात रोज सकाळी साडेचार वाजता श्री खंडेश्वरी देवीची काकडा आरती, यानंतर ८.३० आरती, दुपारी १२ वाजता आरती व महानैवेद्य दाखवला जाणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता मंदिर परिसरात देवीची छबिना पालखी व सवाद्य मिरवणूक व रात्री ८.३० वा.महाआरती

४० फुटी रावणचे हाेणार दहन
पाच ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त पहाटे चार वाजता श्री खंडेश्वरी देवीची महापूजा होऊन सकाळी सात वाजल्यपासून दर्शन सुरू होणार आहे. सायंकाळी सीमोल्लंघनानंतर ७.३० वाजता बीडवासीयांचे आकर्षण असलेल्या ४० फुटी रावण दहन व आतषबाजीने नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

खंडेश्वरी देवी मंदिरात नवचंडी याग
सोमवारी घटस्थापना झाल्यानंतर २ ते ४ ऑक्टोबर असे तीन दिवस नवचंडी याग व विविध कार्यक्रम होणार आहेत. ३ ऑक्टोबर रोजी अष्टमी उपवास असून ४ ऑक्टोबर रोजी पूर्णाहूती होऊन नवरात्रातील उपवासाची सांगता होईल. यानिमित्त मंदिरात दुपारी १२ ते ४ या वेळेत संस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे