आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांपैकी शाहिरी महोत्सव; या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शुक्रवार दि. १७ ते १० जून रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील वीरांचा व थोरांचा कार्य प्रवास या महोत्सवातून सादर होईल आणि त्यातूनच देशभक्ती व देश प्रेमाची भावना वाढीस लागेल अशी आशा अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्र सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. लोककलेतील एक महत्त्वाचा कलाप्रकार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या; शाहिरी या कला प्रकाराचे जतन- संवर्धन व्हावे आणि युवा शाहीर निर्माण व्हावेत यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात शाहिरी पोवाडा या बरोबरच इतर लोककलांचे हे सादरीकरण होणार आहे. शाहिरी कला ही महाराष्ट्रांची पारंपरिक लोककला असून आजही जनसामान्या आपली वाटते. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत शाहिरी कला फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांचे आजही या कलेच्या माध्यमातून मनोरंजन होत असते.आधुनिक युगात लोप पावत चाललेल्या लोककलांचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने तसेच समृद्ध लोककलेला व लोककलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने औरंगाबाद प्रशासकीय विभागातील बीड येथे शाहिरी कला महोत्सव २०२२ चे आयोजन दिनांक १७ जून ते १९ जून २०२२ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कॅनॉल रोड, छञपती शाहु महाराज चौक, बीड येथे करण्यात येत आहे. बीड येथे आयोजित शाहिरी कला महोत्सवात सहभागी कलाकाराचा कला अविष्कार किंबहुना प्रबोधनातून महापुरुषांच्या पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या कलावंताची शाहिरी- पोवाडा तसेच लोकगीत अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचा, रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री.बिभिषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
शाहिरी आणि लोकगीते शाहीर सुरेश जाधव, शाहीर राजा कांबळे व शाहीर सीमा पाटीले छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर समाजप्रबोधनात्मक पोवाडा व लोकगीते सादर करतील.
असा होणार समारोप १९ जून रोजी शाहिरी कला महोत्सव सांगता समारोह होईल. प्रसंगी सयप्पा बंडगर आणि सहकलाकार, सातारा हे धनगरी गजनृत्य सादर करतील तर शाहीर रविराज भद्रे, महिली शाहीर अनिता खरात, शाहीर विष्णू शिंदे हे राणी लक्ष्मीबाई, महात्मा फुले यांचे जीवनकार्य व समाजप्रबोधनपर पोवाडा, लोकगीते सादर करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.