आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवापूर्ती सोहळा:ज्ञानदान कार्य प्रामाणिकतेने करणाऱ्यास फळ मिळतेच ; बोंदार्डे यांचे प्रतिपादन

पाटोदा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानदानाचे कार्य हे पिढ्या घडवणारे कार्य आहे. त्यामुळे हे कार्य प्रामाणिकपणे करणाऱ्या व्यक्तीला फळ हे मिळतेच असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी बोंदार्डे यांनी केले.पाटोदा तालुक्यातील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नफरवाडी येथे शिक्षिका उपदेशी यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोंदार्डे हे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पारगाव केंद्राचे केंद्रप्रमुख येवले, गावचे सरपंच बंडू सवासे, उपसरपंच आबासाहेब चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर मंडलिक, प्रविण शिंदे, सतिश टेकाळे, माजी सरपंच भिमराव तांबे, माजी उपसरपंच सुभाष सवासे, पारगावचे सरपंच पद्माकर घुमरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किशोर तळेकर, सुधीर सवासे, आजीनाथ चव्हाण, रविकांत वनवे, विष्णू ढेरे, बापुराव पवळ, समितीचे माजी अध्यक्ष भारत ढेरे, पारगाव केंद्रातील आदर्श शिक्षक घुमरे, शिक्षिका संध्या शिंदे आदी होते. कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते उपदेशी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक खंडागळे यांनी केले. विद्यार्थिनी वैष्णवी वाघ, ऋतुजा दराडे, आकांक्षा ढोले, पारगाव केंद्रातील आदर्श शिक्षक घुमरे, गाडे, माने यांनी मनोगत मांडले.